कार्तिक आर्यनचा ‘हा’ आगामी चित्रपट थिएटरमध्ये नाही तर, थेट प्रदर्शित होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

मुंबई:कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे. याआधी एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे कार्तिकच्या चित्रपटांची प्रेक्षक आवर्जून वाट बघत असतात. लॉकडाउननंतर चित्रपटगृहं सुरु झाल्यावर चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होऊ लागले. कार्तिकच्या ‘भूल भुलैया २’ने अनेक रेकॉर्ड्स मोडले. पण आता त्याचा आगामी चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे कळते.

गेले काही दिवस कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यातील काही चित्रपटांचे शूटिंग त्याने पूर्ण केले असून ते रिलीजसाठी सज्ज आहेत. कार्तिक काही महिन्यांपूर्वी ‘फ्रेडी’ या चित्रपटावर काम करत होता. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची नुकतीच घोषणा करण्यात आली.बालाजी टेलिफिल्म्स आणि नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स निर्मित शशांक घोष दिग्दर्शित ‘फ्रेडी’ हा थ्रिलर चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पण निर्मात्यांनी हा चित्रपट किती तारखेला प्रदर्शित होईल हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र हा चित्रपट पुढच्या वर्षीच प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे.याबद्दल कार्तिक आर्यन म्हणाला, “‘फ्रेडी’ चित्रपटाचा मला भाग होण्यासाठी संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. या चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी आहे. या आधी मी अशी कथा कधीही पाहिलेली नव्हती. त्यामुळे ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर हा चित्रपट रिलीज होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने