बॉलिवूडचे कलाकारही किरीट सोमय्यांच्या डान्सपुढे फिके...

मुंबई :  भल्याभल्या राजकीय नेत्याच्या मागे शनी लावणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे जेव्हापासून राज्यात नवीन सरकार आले आहेत, तेव्हापासून जरा जास्तचं आंनदी दिसताय. आनंद व्यक्त करण्याची कोणतीही संधी ते सोडतांना दिसत नाही.  नुकतीच त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाला सपत्नीक हजेरी लावली. या शोच्या प्रोमोचा व्हिडिओ सध्या सोशल मिडिआवर व्हायरल होत आहे. हा भाग प्रेक्षकांना १७ ऑक्टोबर रोजी पाहता येणार आहे.झी वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये किरीट सोमय्या यांनी ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘ढोलीडा’  गाण्यावर ठेका धरलाय. गाणे वाजताच ते जागेवरुन उठतात आणि गरबा खेळायला सुरवात करतात. गरबा खेळत असतांना त्यांच्या पत्नीदेखील त्यांना साथ देतात आणि गाण्यावर ताल धरत गरबा खेळतात. त्यांच्या या गरब्याला प्रेक्षकांनी, परीक्षक स्वप्नील जोशीनेदेखील पसंती दर्शवत दाद दिली.त्याच बरोबर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम सादर करत असलेल्या नाटकाच्या भागात आंघोळ करण्याबाबत चर्चा होते. तेव्हा कुशल म्हणतो, 'आता आला आहात तर पुन्हा आंघोळ करा. सोमय्या साहेबांकडे बघा, दिवसातून चार चार वेळा माणूस आंघोळ करतो. कुठेही सभा असूदे, पहिल्यांदा हा माणून आंघोळीची व्यवस्था करतो आणि मगच सभेला जातो.' हे खरंय का असं विचारताच आधी सोमय्या कपाळावर हात मारतात आणि होकार देतात. त्यांच्या पत्नीनेही याला दुजोरा दिला आहे.किरीट सोमय्या यांचा डान्स याआधीही व्हायरल झाला होता. किरीट सोमय्या यांनी पनवेल येथे नवरात्रौत्सवात ड्रमसेट वाजवला आणि त्यांनी घोळक्यात एण्ट्री मारत गरबा खेळला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने