Kolhapur : अंबाबाईचा आज नगरप्रदक्षिणा सोहळा

 कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी श्री अंबाबाईची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सालंकृत पूजा बांधली. ही पूजा गजानन मुनीश्वर, मुकुल मुनीश्वर, रामकृष्ण मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली. ऐतिहासिक भवानी मंडपातील श्री तुळजाभवानीची दीपलक्ष्मी रूपातील आकर्षक पूजा बांधली. दरम्यान, आज रात्री श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सजणार आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होईल. रात्री नऊच्या सुमारास अंबाबाईच्या वाहनाचे पूजन होऊन नगरप्रदक्षिणेला प्रारंभ होईल. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गांवरून जाताना फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी देवीचे स्वागत होईल. तुळजाभवानी मंदिरात पानाचा विडा देऊन देवीचे स्वागत होईल.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने