प्रकल्प गुजरातलाच का? राज ठाकरेंच्या प्रश्नाला शेलारांचं उत्तर; म्हणाले, परिपक्व राजकारणी...

मुंबई : महाराष्ट्रातील बडे प्रकल्प हे गुजरातलाच कसे जातात? असा सवाल करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. यावर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केलं.शेलार म्हणाले, समोर दिसलेल्या टिझरवर प्रतिक्रिया देणं यात परिपक्व राजकारण नाही. राज ठाकरेंना मी परिपक्व राजकारणी मानतो, त्यामुळं त्यांनी प्रकल्पांसंबधी जे सवाल उपस्थित केले आहेत, त्याची माहिती मी त्यांना देईन. इलेक्ट्रॉनिक विषयातील क्लस्टर पुण्यात रांजणगावला येईल तसेच चार महिन्यात जे प्रकल्प महाराष्ट्रात येताहेत, त्याचंही राज ठाकरेंनी स्वागत करावं, असंही शेलार म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट वाटलं नसतं. जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर दुर्दैव आहे. पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. प्रत्येक राज्यातल्या लोकांना आपलं घर सोडून परराज्यात जाण्याची गरज पडू नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने