Chanakya: महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' आता रुपेरी पडद्यावर.. पोस्टर पाहाच!

मुंबई: गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाचेच नव्हे तर अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल, राजकीय खेळी, पक्षांमधील फुट, डावपेच, राडे आपण सर्वांनीच पाहिले. अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणाची घडी सुरळीत झालेली नाही. पण या राजकरणावर चित्रपट, वेब सिरिज तयार करण्यासाठी अनेक दिग्दर्शक, निर्माते सज्ज झाले आहेत. अशाच एका चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. (Chanakya new marathi movie coming soon based on maharashtra politics )महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता निलेश नवलाखा याने चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करत असून, 2023मध्ये हा प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचे पोस्ट लॉंच करण्यात आले आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने