दिवाळीआधी पैसे गुंतवा; येत्या काळात 'या' शेअर्समध्ये दमदार नफा

 मुंबई : शेअर बाजार अशी जागा जिथे आहे जिथे तुम्ही एका क्षणात कोट्यधीश होऊ शकता आणि दुसऱ्या क्षणात तुमची संपत्ती शुन्यावर येऊ शकते. त्यामुळेच इथे योग्य शेअर्सची निवड करणे गरजेचे आहे. अशात तुम्हाला मार्केट एक्सपर्ट मदत करु शकतात. मार्केट एक्सपर्ट आणि आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी काही मजबूत शेअर्स आणले आहेत, ज्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

सगळ्यात आधी त्यांनी अल्ट्राटेक सिमेंट (UltraTech Cement) या शेअरची निवड केली आहे. या कंपनीची क्षमता 114 दशलक्ष टन आहे, जी एसीसी आणि अंबुजा सिमेंटपेक्षा जास्त आहे. उच्च परतावा मिळवण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.अल्ट्राटेक सिमेंटमध्ये लॉजिस्टिक पॉवर जास्त आहे. ब्लूचिप कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट ही सर्वात दमदार कंपनी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कंपनीची क्षमता  114 दशलक्ष असली तरी ती आणखी वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. पावसाळा संपला आहे आणि बांधकाम व्यवसायात वाढ होत आहेत. अशा स्थितीत सिमेंटच्या किमती वाढतील आणि यात अल्ट्राटेक सिमेंटला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


अल्ट्राटेक सिमेंटची (UltraTech Cement) किंमत सध्या 7,500 रुपये आहे. पण दिवाळीपर्यंत अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 8,500 रुपयांवर गेल्यास आश्चर्य वाटायला नको असेही भसीन म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने