आशिया चषकावर सातव्यांदा नाव कोरण्यासाठी अवघ्या ६६ धावांची गरज.

बांगलादेश:  बांगलादेशातील सिल्हेट येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी परतला होता एका क्षणी ५० धावा तरी होतील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीसमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून फक्त दोघीनाच दोन आकडी संख्या गाठता आली. इनोका रणविरा आणि ओधाडी रणसिंघे यांनी अनुक्रमे १८ आणि १३ धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी तिला साथ देत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.या स्पर्धेच्या टी२० स्वरूपातील बदलानंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीलंकेच्या संघाला विजेतेपदाची सुरुवात करायची आहे पण ती होताना काही दिसली नाही. टीम इंडियाचे पारडे श्रीलंकेविरुद्ध जड आहे. आतापर्यंत दोन्ही संघ टी२० मध्ये २२ वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यामध्ये भारताने १७ वेळा विजय मिळवला असून श्रीलंकेने फक्त चार सामने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकालच लागला नाही. त्याचबरोबर भारत सलग आठव्यांदा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. श्रीलंका पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी १४ वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने