हिंदीतून वैद्यकीय शिक्षण धोरणाचा अभिमान; शाहांचं ट्वीट शेअर करत म्हणाले...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश सरकारच्या वैद्यकीय शिक्षण हिंदीत देण्याच्या संकल्पनेची प्रशंसा केली आणि त्यामुळे देशात खूप मोठा सकारात्मक बदल घडेल, असंही सांगितलं. वैद्यकीय शिक्षण राष्ट्रीय भाषेत देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी तीन विषयांच्या हिंदीतील पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन केले.

हा दिवस ऐतिहासिक असल्याचं सांगत पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं एक ट्वीट शेअर केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात, "वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात ही फक्त एक सुरुवात आहे. ही सुरुवात देशामध्ये मोठे सकारात्मक बदल घडवून आणेल. यामुळे लाखो विद्यार्थी स्वतःच्या भाषेमध्ये शिकू शकतील. त्यांच्यासाठी संधींची अनेक कवाडं खुली होतील."भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमित शाह म्हणाले की, मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हिंदीमध्ये वैद्यकीय शिक्षण सुरू करून पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण केलं याचा मला अभिमान वाटतो. हा क्षण देशातील शिक्षण क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचं प्रतीक आहे आणि त्यासाठी मी पंतप्रधानांचे आभार मानतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने