मैत्रीणीच्या चहाचं बील द्यायला 'बिल'कडे नव्हते पैसे, आता साऱ्या जगाचं...

दिल्ली : जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या लीस्टमध्ये असणाऱ्यांमधील एक व्यक्ती म्हणजे बिल गेट. आज बिल गेट्सजवळ संपत्ती आणि प्रतिष्ठा भरभरून असल्याचे आपल्याला दिसते. मात्र त्याला प्रगतीच्या या शिखरावर पोहोचण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली. आज बिल गेट्सचा 68 वा वाढदिवस. घरातून सगळ्यात लहान पण चातुर्य आणि कौशल्यात अव्वल असणारा बिल गेट. त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याचा यशस्वी प्रवास.बिलने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी पहिला सॉफ्टवेअर प्रोग्राम बनवला होता. आणि वयाच्या १७ व्या वर्षी त्याने त्याचा पहिला कंप्युटर प्रोग्राम विकलाही. बिलला लहानपणापासूनच टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट होता. आज कंप्युटर किंवा लॅपटॉप हे तंत्रज्ञानातील अत्यावश्यक साधन बनलंय.


1975 मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना

बिल गेट्सने १९७५ मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. आणि अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत त्याची ही कंपनी २५ लाख डॉलरपर्यंत पोहोचली. टेक्नॉलॉजी आणि बिजनेसची उत्तम सांगड बिल गेट्सने घातली आहे. ऑनलाइन गेमिंग डेवलप करण्यातही बिल गेटचा मोठा हात आहे.

1986 मध्ये अरबपतींच्या लीस्टमध्ये समावेश

माहितीसाठी वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी बिल गेट्सचा अरबपतिंच्या लिस्टमध्ये समावेश झाला. 1986 मध्ये कंपनी शेअर मार्केटच्या लिस्टमध्येही आली. कालांतराने त्यांचा बिलीनीयरच्या लीस्टमध्ये त्यांचा समावेश झाला. बिल गेट दरवर्षी त्याचा संपत्तीचा मोठा भाग दान करतो. त्याच्या कमाईच्या 95 टक्के संपत्ती तो दान करणार असल्याचीही त्याने घोषणा केली आहे.

एके काळी मैत्रिणीच्या चहाचं बील द्यायला पैसे नव्हते

आज बिल गेट्स हा जगातील पाचवा श्रीमंत माणूस असला तरी एके काळी या व्यक्तीजवळ त्याच्या मैत्रिणीच्या चहाचं बील देण्याइतपतही पैसे नव्हते. आज याच व्यक्तीचं जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये नाव घेतल्या जातं. आज तो 110 बिलीयन डॉलरचा मालक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने