एकतर्फी प्रेमाचा असा झाला अंत; धावत्या रेल्वेसमोर.

चेन्नईः चेन्नई येथील महाविद्यालयीन तरुणीसोबत एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलानेच हे घृणास्पद कृत्य केलंय. त्यामुळे त्या तरुणीचा मात्र जीव गेलाय. ह्या एकतर्फी प्रेमातून नेमकं काय घडलं, ते पाहूया...अदमबक्कम येथील रहिवासी असलेली वीस वर्षीय सत्या एका खासगी महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तिच्या कुटुंबातील बहुतेक सदस्य पोलिस खात्यात आहेत. सतीश नावाचा एक तरुण मागील काही दिवसांपासून तिचा सातत्याने पाठलाग करत होता. सतीश हादेखील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. गुरुवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरुन वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या सतीशने थॉमस रेल्वे स्थानकावरुन तिला धावत्या रेल्वेसमोर ढकलले. यातच सत्या हिचा मृत्यू झाला. चेन्नईतील अदमबक्कम येथे ही घडला घडली आहे.

याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी थॉमस रेल्वे स्थानकावरुन सतीशला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. एका माजी पोलिस अधिकाऱ्याच्या मुलानेच असे कृत्य केल्याने चेन्नईमध्ये संताप व्यक्त होतोय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने