उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत त्यांचं मोठं योगदान - CM एकनाथ शिंदे

 मुंबई : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं आज सकाळी निधन झालं. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज मेदांता रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना देशासह राज्यातल्याही प्रमुख नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले.उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे मोठे योगदान आहे. मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना, असं ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलायम सिंग यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने