आजही पेडणेकरांची चौकशी होणार; किरीट सोमय्यांनी केला 'हा' दावा

 मुंबईः 'एसआरए' घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. काल पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.आज सकाळी किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, किशोरी पेडणेकरांना आज पुन्हा दादर पोलिस स्टेशनमध्ये यावे लागणार. दादर पोलिस स्टेशनमध्ये १२ एसआरए फ्लॅट्सच्या विक्री प्रकरणी चौकशी सुरु आहे. किश कार्पोरेट कंपनीविरुद्ध मरीन लाईन पोलिस स्टेशनमध्येही चौकशी सुरु आहे. या कंपनीला बीएमसीचं कोविडमध्ये कंत्राट मिळालं होतं. आपली यासंदर्भातील याचिका असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

'एसआरए'मध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी चौघांवर अटकेची कारवाई झालेली आहे. या चौकशीतून किशोरी पेडणेकर यांचं नाव पुढे आलं होतं. काल पेडणेकरांची पंधरा मिनिटं चौकशी झाली. त्यानंतर आज पुन्हा दादर पोलिसांनी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने