भारतीसह पतीविरुद्ध 200 पानांचं आरोपपत्र; नेमकं प्रकरण काय?

मुंबईः प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने आज मोठी कार्यवाही केली.२०२०मध्ये भारती सिंग हिच्या घरामध्ये एनसीबीने छापा टाकला हातो. यामध्ये ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणात त्यांना अटकदेखील करण्यात आलेली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याच प्रकरणी २०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्याने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने