15 वर्षांची मुस्लिम मुलगीही करू शकते पसंतीच्या व्यक्तीशी लग्न; कोर्टाचा मोठा निर्णय

पंजाब : 15 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी  तिच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न करू शकते आणि तिचा विवाहसुध्दा वैध मानला जाईल, असा महत्वपूर्ण निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं  एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला.या प्रकरणी 16 वर्षीय मुलीलाही पतीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली. न्यायमूर्ती विकास बहल  यांच्या खंडपीठासमोर जावेद नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यामध्ये त्यानं आपल्या 16 वर्षांच्या पत्नीसोबत राहण्याची परवानगी मागितली होती. मुलीला हरियाणातील पंचकुला  येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. याचिकाकर्त्यानं दावा केला होता की, 'लग्नाच्या वेळी त्याच्या पत्नीचं वय 16 वर्षांपेक्षा जास्त होतं. लग्न तिच्या स्वेच्छेनं आणि कोणतीही जबरदस्ती न करता झालं.'जावेदनं आपल्या वकिलामार्फत सांगितलं की, आम्ही दोघंही मुस्लीम आहोत आणि 27 जुलैला मणि माजरा येथील मशिदीत मुस्लिम रितीरिवाजांनुसार आम्ही निकाह केला. युनूस खान विरुद्ध हरियाणा राज्यातील उच्च न्यायालयाच्या समन्वय पीठाच्या निर्णयावर अवलंबून राहून याचिकाकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, 'मुलीला याचिकाकर्त्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी.'मात्र, राज्याच्या वकिलांनी या याचिकेला विरोध करत ती अल्पवयीन असल्यामुळं तिला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात येत असल्याचं सांगितलं. राज्याच्या वकिलांनी याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. परंतु, उच्च न्यायालयानं आपल्या निकालात 15 वर्षे पूर्ण केलेल्या मुलीला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार आहे, असं नमूद केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने