उद्धव ठाकरे यांचे राजकारण मातोश्री पुरते मर्यादित; नारायण राणे यांचा घणाघात.

 पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता केवळ मातोश्री पुरते मर्यादित राहिले आहे. शिवसेना आता राहिलेली नाही. त्यांच्याकडे केवळ सहा ते सात आमदार असून, त्यापैकी चार जण आमच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात केला.केंद्र सरकारच्या वतीने देशात काही तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. पुण्यातही 'यशदा' येथे राणे यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.महाराष्ट्रात सध्या राजकीय आरोप- प्रत्यारोपांमुळे राजकारणातील स्तर खालावत चालला आहे. या संदर्भात राणे म्हणाले, ''महाराष्ट्राच्या राजकारणातील स्तर खालावलेला नाही. विरोधकांच्या वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. मला राजकारणातील स्तर घसरू नये, असे वाटते. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे राज्य सरकारचा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप केला होता.या संदर्भात राणे म्हणाले, "याबाबत पुण्यातील लोकांना जास्त माहिती आहे. मला कोकणात राहून काही माहिती नाही. परंतु जाधव यांनी भाषणामध्ये केलेली टिंगल, मस्करी हा काय चांगला गुण नाही." तुमच्या मुलांकडूनही राजकीय आरोप केले जातात, याबाबत राणे यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलेच दिसते का, असा प्रश्न करीत विकासाबाबत बोला. अशा प्रश्नांचे उत्तर द्यायला मी येथे आलेलो नाही, असे सांगत नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारकडून रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत असलेल्या दिवाळीच्या किटवरती सत्ताधारी राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. याबाबत राणे म्हणाले, "फोटो दिला तर बिघडले कोठे ? त्याच्यावर कागद टाका आणि पाकीट फोडा. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हीही फोटो लावून नागरिकांना कीट द्या. परंतु संकुचित वृत्ती ठेवू नका."पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आठ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. या देशात दहा लाख तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. पहिल्या टप्प्यात आज देशभरात 75 हजारांहून अधिक तरुण-तरुणींना नोकरी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवात तरुण- तरुणींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असे त्यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने