आईवरुन शिव्या प्रकरण: “चंद्रकांत पाटील कोल्हापूरकरांची माफी मागा, नीच वक्तव्य करुन…”; राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी संतापले

 कोल्हापूर : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यामधील कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलताना पाटील यांनी केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल आपण अपशब्द खपवून घेणार नाही असं सांगताना चंद्रकांत पाटलांनी थेट आई-वडिलांनी शिवी दिली तर चालेल पण मोदी-शाहांना शिवी दिलेले सहन करणार नाही अशी आपली ओळख असल्याचं ते दोन नेत्यांमधील संवादाचा दाखला देत म्हणाले होते. मात्र ही गोष्ट सांगताना त्यांनी कोल्हापूरचा उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे चांगलेच संतापले आहे. त्यांनी आपला संताप ट्वीटरवरुन व्यक्त केला आहे.चंद्रकांत पाटलांनी “आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे,” हे विधान केल्याने अमोल मिटकरींनी आक्षेप घेतला आहे. ट्वीटरवरुन आपला संताप व्यक्त करताना मिटकरींनी, “आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. असे नीच वक्तव्य करुन कोल्हापूरच्या मताची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरकरांची व महाराष्ट्राची तात्काळ जाहीर माफी मागावी” अशी मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने