कोल्हापूरमध्ये विधानसभेची आतापासूनच व्यूहरचना; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा.

कोल्हापूर : आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने एकेका मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात दिसले. पन्हाळा- शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रमात आघाडीच्या उमेदवाराशी पाठीशी राहिले पाहिजे; यापुढे ‘फिक्सिंग’ चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र आघाडीचा मुख्य घटक असलेल्या काँग्रेसचा समावेश होण्याबाबत निर्णय गुलदस्त्यात असल्याने आघाडीला मूर्त स्वरूप कसे येणार, हा प्रश्न उरतोच.आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे सूतोवाच कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून केले जात आहे. आघाडीअंतर्गत पक्षांचे मतैक्य घडवण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात केला. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी त्यांच्या गावात बांधलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते व माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाले. प्रास्ताविकात आसुर्लेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पन्हाळा तालुक्यात ताकद पुरवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने