जेडीयूचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा होता डाव; नितीश कुमारांनी कुणावर केला गंभीर आरोप?

पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या जेडीयू पक्षाबद्दल गंभीर विधान केलं आहे. जेडीयूचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा डाव होता, असं नितीश कुमार म्हणालेत. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याबद्दल नितीश यांनी भाष्य केलंय.

प्रशांत किशोरांनी दावा केला होता की, आपल्याला नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षाचं उत्तराधिकारी होण्याची विनंती केली होती. यावर बोलतांना नितीश कुमार म्हणाले की, ''हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी त्यांनी कोणतीही ऑफर दिलेली नाही. ते आपल्या मर्जीप्रमाणे बोलत असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल रोज काय बोलणार.''''उलट प्रशांत किशोर यांनी मला जेडीयूचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करा, असं सांगितलं होतं. परंतु मी माझा पक्ष काँग्रेसमध्ये का विलीन करु?'' असं मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले आहेत. शनिवारी ते माध्यमांशी बोलत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने