पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक होण्याची शक्यता

 इस्लामाबाद : पाकिस्तान तहरीक - ए - इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना परदेशी निधी प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे, असे वृत्त ARYने दिले आहे. तर तरिक शफी, हमीद झमन आणि सैफ नाइझी या पाकिस्तान तहरीक - ए - इन्साफ च्या नेत्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनाही अटक होण्याची दाट शक्यता आहे.

पीटीआयचे नेते सेफुल्ला नाईझी याला काल पाकिस्तानच्या तपास संस्थेने अटक केली आहे. त्याच्यावर अनधिकृत संकेतस्थळ चालवल्याचा आरोप आहे. त्याद्वारे अनधिकृत कामे केले जात असल्याचा आरोप असल्याचं वृत्त ARY ने दिलं आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने