थोड्याच वेळात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा

 बीड:थोड्याच वेळात पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे हा दसरा मेळावा होणार असून त्यामध्ये खासदार प्रितम मुंडेही सहभागी असणार आहेत. तर त्यांच्या रॅलीला सुरूवात झाली आहे.आज सर्वत्र दसरा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जात असतानाच, महाराष्ट्र राज्यात मात्र आज या सणाला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. कारण राज्यात आज महत्वाचे चार दसरा मेळावे होणार आहे. यामध्ये मुंबईत दोन मेळावे तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव घाट येथे होणारा तिसरा मेळावा आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने