संजय राऊतांच्या जमीन अर्जावर तारीख पे तारीख!

मुंबई : त्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा वाढ केलीय. संजय राऊत यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयासमोर हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली होती.मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने