413 कोटींचा गुलाबी हिरा! हिऱ्याच्या विक्रीने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

हाँककाँग: हाँककाँगमध्ये काही दिवसांआधी दूर्मिळ हिऱ्याचा लीलाव करण्यात आला. विक्रीनंतर या हिऱ्याची जी किंमत आली त्याने वर्ल्ड रेकॉर्डच तोडला. हाँककाँगमधील हा दूर्मिळ हिरा ४.९९ कोटी डॉलरमध्ये विकल्या गेला. हिऱ्याची प्रति कॅरेट किंमत जगातील सर्वाधिक असून या हिऱ्याने वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.

भारतीय करंसीमध्ये या हिऱ्याची किंमत जवळपास ४१३ कोटी एवढी आहे. या गुलाबी हिऱ्याला सोदबी हाँगकाँगमध्ये लीलाव करण्यात आलाय. या हिऱ्याची विक्री किंमत ३९.२ कोटी एवढी आहे. विलियमसन पिंक स्टारचं नाव दोन पौराणिक पिंक डायमंड्समध्ये घेतल्या गेलं होतं. पहिला विलियमसन हिरा हा २३.६० कॅरेटचा होता. या हिऱ्याला दिवंगत महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या लग्नाला भेट म्हणून देण्यात आलं होतं.दुसरा गुलाबी हिरा हा ५९.६० कॅरेटचा आहे. २०१७ मध्ये झालेल्या लीलावामध्ये हा हिरा ७.१२ कोटी डॉलरमध्ये विकल्या गेला. विलियमसन पिंक स्टार ऑक्शनमध्ये येणारा हा जगातील दुसरा सगळ्यात मोठा गुलाबी हिरा आहे. गुलाबी हिरा हा रंगीत हिऱ्यांमधला सगळ्यात महागडा हिरा आहे. यावर्षी जगातील पांढरा हिरा 'द रॉक' जगात सगळ्यात महाग विकल्या गेला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने