नाचता नाचता झाला अपघात, रुबिना दीलैकला गंभीर दुखापत...

मुंबईः प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या खुपच चर्चेत आहे. बिग बॉस शो जिंकल्यानतंर तिच्या लोकप्रितेत प्रचंड वाढ झाली. त्यानतंर ती खतरो के खिलाडी याशोमध्येही दिसली. आता ती 'झलक दिखला जा 10' मध्ये दमदार परफॉर्मन्स देतांना दिसत आहे. रुबीनाने  शोमध्ये आपल्या नृत्यांने लोकांची मने जिंकली आहे.रुबीनाने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. यात रुबिना डान्सचा सराव करताना जखमी झाल्याचे दिसतेय.व्हिडिओमध्ये रुबीनाला कशी दुखापत झाली हे दिसत आहे. कोरिओग्राफर सनम जोहर आणि रुबीना डान्सचा सराव करतांना दिसताय. यात सनमला रुबीनावर उडी मारावी लागली, पण सनमचा तोल बिघडला आणि रुबिना जोरात खाली पडते आणि नतंर ती जमीनीवरच पडलेली दिसते. या अपघातात तिच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

सोशल मीडियावर सर्वजण तिची विचारपुस करताय. रुबीना लवकर बरी व्हावी यासाठी. सृष्टी रोडे, अनेरी वजानी, जन कुमार सानू, निया शर्मा यांसारख्या कलाकारांनी कमेंट करून तिची विचारपुस केली आहे. सनम जोहर या शोमध्ये रुबिनाचा कोरिओग्राफर आहे. सनम आणि रुबीनाच्या डान्समधील ट्युनिंग खूप पसंत केले जात आहे आणि ती या शोच्या विजेत्यापदाची दावेदारही आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिने बरे व्हावे आणि या शोमध्ये धमाकेदार एंन्ट्री मारावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करताय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने