सलमान,शाहरुखपेक्षा अल्लू अर्जूनचीच हवा, रिलीजआधीच 'पुष्पा 2' च्या कारनाम्याची रंगली चर्चा.

मुंबई : सिनेमागृहात बडे सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. 'पुष्पा 2','पठाण', 'जवान,''टायगर 3',डंकी आणि या व्यतिरिक्त असे कितीतरी सिनेमांची नावं घेता येतील. पण अल्लू अर्जूननं म्हणे शाहरुख आणि सलमान खानला पाठी टाकलं आहे. तुम्हाला माहितीय का लोक कोणत्या हिंदी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर यासंदर्भात आमच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. ना सलमान खानचा 'टायगर 3', ना शाहरुखचा 'पठाण' तर लोक प्रतिक्षा करत आहेत ती अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' ची. होय,एका सर्वेनुसार हे कळालं आहे की सर्वसामान्य पब्लिक अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' पाहण्यासाठी आतुर आहेत.सध्या अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' च्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. रिपोर्टनुसार या सिनेमाचं शूटिंग येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे. Ormax Media ने बहुप्रतिक्षित असलेल्या हिंदी सिनेमांचा एक सर्वे केला होता. 15 ऑक्टोबर पर्यंत अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा नंबर वन पदावर आहे असं दिसून आलं आहे. त्यानंतर शाहरुखचा 'पठाण'च्या प्रतिक्षेत लोक आहेत आणि तिसऱ्या नंबरवर सलमान खानचा 'टायगर 3' आहे. याव्यतिरिक्त चौथ्या आणि पाचव्या नंबरवर शाहरुखचा 'जवान' आणि 'डंकी' असल्याचं आढळून आलं आहे.

'पुष्पा-द रूल' विषयी बोलायचं झालं तर या सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमार करत आहे. सिनेमात अल्लू अर्जुन , फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना लीड रोल मध्ये आहेत. सिनेमाचं शूटिंग अद्याप सुरु झालेलं नाही. रिपोर्टनुसार, हा सिनेमा ५ भाषांमध्ये पुढील वर्षी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.तर शाहरुख खानच्या 'पठाण' मध्ये दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम आपल्याला दिसणार आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. शाहरुख आपल्याला शेवटचा 2018 मध्ये 'झिरो' सिनेमात अनुष्का शर्मासोबत दिसला होता. तसंच, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमातही तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. याव्यतिरिक्त शाहरुख खान 'जवान' सिनेमात साऊथची अभिनेत्री नयनतारासोबत लीडमध्ये दिसेल. शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या 'डंकी' सिनेमातही काम करत आहे. या त्याच्या दोन्ही सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने