राहुल गांधींनी केलं भाष्य; नव्या शिक्षण धोरणालाही विरोध

 तुमकूर (कर्नाटक) : दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केलेल्या बंदीच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) भाष्य करत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.राहुल गांधी म्हणाले, मला असं वाटतं द्वेष पसरवण्याचं काम कोणती व्यक्ती करतेय तसेच ती कुठल्या समाजाची आहे हे महत्वाचं नाही. द्वेष आणि हिंसेसारखी देशविरोधी कृत्ये जो कोणी करेल अशा लोकांविरोधात आपण लढू. आरएसएसवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणं आरएसएसनं ब्रिटिश आणि सावरकर यांना मदत करण्यासाठी नियमित पगार दिला जात होता. स्वातंत्र्य संग्रामात भाजपचा कधीही सहभाग नव्हता. भाजप ही तथ्ये नाकारु शकत नाही. पण काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला.

मी कायमचं नव्या कल्पना समोर ठेवल्या ज्या भाजप आणि आरएसएसला विचलीत करतात. त्यामुळं मला असत्य आणि चुकीचं दाखवण्यासाठी मीडियामध्ये हजारो कोटी रुपये आणि ऊर्जा खर्च करण्यात आली आहे. हे असंच चालू राहणार आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने