साखर आयुक्तालयावर निघणार धडक मोर्चा; एफआरपी...

पुणेः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. एफआरपी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या ७ नोव्हेंबर रोजी हा धडक मोर्चा निघेल. स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत हा मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. मागील वर्षीची एफआरपी आणि त्यावर अधिक रक्कम तात्काळ मिळावी, साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन काढा, यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा धडकणार आहे.दरम्यान, यावर्षी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ऊस असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी अतिरिक्त ऊस घेऊन जाण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे काही प्रमाणात मराठवाड्यातील ऊसाचे गाळप होऊ शकले. मात्र आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने