अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी अपडेट समोर; CM योगींनी दिली महत्वाची माहिती

उत्तर प्रदेश: आचार्य धर्मेंद्र .यांचा पराक्रम खूप मोठा आहे. देशाची जुनी आणि धार्मिक परंपरा त्यांनी पुढं नेलीय. आचार्य धर्मेंद्र यांनी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली राम मंदिर आंदोलनाला मोठी चालना दिली. धर्मेंद्रांनी 50 वर्षे हिंदू समाजाचं सांस्कृतिक चळवळीत नेतृत्व केलं, असं स्पष्ट मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ . यांनी व्यक्त केलं.

योगी आदित्यनाथ गुरुवारी आचार्य धर्मेंद्र यांचे उत्तराधिकारी स्वामी सोमेंद्र यांच्या चादरपोशी कार्यक्रमात बोलत होते. योगी म्हणाले, देशाची फाळणी झाली, तेव्हा संतांच्या आंदोलनात या खंडपीठाची मोठी भूमिका होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारणीचं काम पुढं नेलं आहे. राम मंदिराचं. काम 50 टक्के पूर्ण झाल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.


स्वामी विवेकानंदांनी ज्या प्रकारे समर्थ रामदासांची परंपरा पुढं नेली, त्याच पद्धतीनं स्वामी सोमेंद्र आता आचार्य धर्मेंद्र यांची परंपरा पुढं नेत आहेत. आचार्य धर्मेंद्र यांचे उत्तराधिकारी स्वामी सोमेंद्र यांच्या चादरपोशी सोहळ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली होती. योगी आदित्यनाथ आणि खासदार बाबा बालकनाथ सकाळी 10.40 वाजता लखनौहून हेलिकॉप्टरनं जयपूर जिल्ह्यातील विराटनगर शहरामधील पंचखंड हनुमान मंदिर (भीम डुंगरी) जवळील हेलिपॅडवर उतरले. येथून पंचखंड हनुमान मंदिरात ते पोहोचले. यावेळी त्यांनी 15 मिनिटं सभेला संबोधित केलं. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मंचावर अल्वरचे खासदार महंत बालकनाथ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने