रश्मिका मंदानाने ‘या’ गोष्टीत स्वतःला उत्कृष्ट ठरवत केली रणबीर कपूरशी तुलना, म्हणाली, “मी त्याच्यापेक्षा जास्त…”

मुंबई :  ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर अभिनेता रणबीर कपूर नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो आता ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटात तो दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच तिने तिचा रणबीरबरोबर शूटिंग करण्याचा अनुभव शेअर केला. यात रणबीरचा सेटवरीला वावर कसा असतो याबरोबरच अनेक गोष्टींचा खुलासा तिने केला आहे. हे सांगताना तिने स्वतःची रणबीरशी तुलनाही केली आहे.रश्मिका मंदानाने एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरबरोबर ‘अॅनिमल’ चित्रपटात काम करताना कसे वाटले हे सांगितले. रश्मिका मंदाना म्हणाली, ‘रणबीर सर्व महिलांची खूप काळजी घेतो. तो खरा जेंटलमॅन आहे. तो एक अतिशय साधा माणूस आहे, जो सर्वांशी खूप छान बोलतो.” रणबीरबद्दल आणखीन काही गोष्टींचा खुलासा केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने