दिवाळीत भारताच्या सर्वात वजनदार 'रॉकेट'चं लॉंचिंग; सोबत ३६...

नवी दिल्लीः यावर्षीची भारताची दिवाळी चांगलीच धुमधडाक्यात होणार असल्याचं दिसतंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सर्वात वजनदार रॉकेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोच्या या रॉकेटचे नाव 'लॉन्च व्हीकल मार्क-३' आहे.


इस्रो दिवाळीच्या आदल्या दिवशी हे रॉकेट लॉंच करणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता श्रीहरीकोटा येथून हे रॉकेट लाँच होईल. विशेष म्हणजे या रॉकेटमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३६ उपग्रह लाँच होणार आहेत. या मिशनचं नाव LVM3-M2/OneWeb India-1 असं असणार आहे.

ब्रिटिश स्टार्टअप कंपनी वनवेबचा उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. हा उपग्रह इंटरनेट सुविधा प्रदान करणारा आहे. वनवेब या कंपनीत एअरटेलच्या भारती एंटरप्रायजेसची भागीदारी आहे.वनवेब या कंपनीसोबत इस्रोचा करार झालेला आहे. त्यानुसार असे दोन लाँचिंग होणार आहे. २३ ऑक्टोबरच्या लाँचिंगनंतर पुढच्या वर्षात जानेवारी महिन्यात एक मोहीम संपन्न होईल. हे ब्रॉडबँड कम्युनिकेशन सॅटेलाईट आहेत. त्याचे नावे वनवेब लिओ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने