भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, 8 वर्षात आम्ही 10 वरून 5 वर घेतली झेप : नरेंद्र मोदी

वी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'रोजगार मेळा'  अंतर्गत 10 लाख कर्मचाऱ्यांसाठी भरती मोहिमेचा शुभारंभ केला. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याचा शुभारंभ केला.यावेळी पंतप्रधान मोदींनी 75 हजार लोकांना नियुक्तीपत्रंही दिली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हरियाणातील गुरुग्राममध्ये होत असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील PMAY-G च्या 4.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या 'गृह प्रवेश'मध्ये सहभागी होतील. या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात 35,000 कोटींहून अधिक खर्च करून सुमारे 29 लाख घरं बांधण्यात आली आहेत.नरेंद्र मोदी म्हणाले, भारतातील युवा शक्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या 8 वर्षात देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे. आज त्याला आणखी एक दुवा जोडला गेला आहे. आज केंद्र सरकार 75000 तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण स्वावलंबी भारताच्या मार्गावर चालत आहोत. यामध्ये आमचे नवोदित उद्योजक, शेतकरी, सेवा आणि उत्पादन सहयोगी यांचा मोठा वाटा आहे.

रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी म्हणाले, येत्या काही महिन्यांत लाखो तरुणांना भारत सरकार वेळोवेळी नियुक्ती पत्रं प्रदान करेल. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 7-8 वर्षात आम्ही 10 वरून 5 वर झेप घेतली आहे. आज आमचा सर्वाधिक भर तरुणांच्या कौशल्य विकासावर आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत देशातील उद्योगांच्या गरजेनुसार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे, असं त्यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने