पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ सांगणाऱ्या नरेंद्र मोदींचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार, म्हणाले “अखंडता…”

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्यानंतर जगभरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. व्लोदिमिर झेलेन्स्की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन एकमेकांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा संघर्षांवर संवादातून मार्ग काढण्याची गरज अधोरेखित केली.युक्रेनची अखंडता कायम राखण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यासाठी झेलेन्स्की यांनी मोदींचे आभार मानले. तसंच युद्धासाठी ही योग्य वेळ नसल्याचं या मोदींच्या वक्तव्याचं महत्त्वही सांगितलं. दरम्यान ‘युक्रेन संघर्षांवर लष्करी मार्गाने कोणताही तोडगा निघू शकणार नाही. या संघर्षांमुळे युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्प धोक्यात आले आहेत. याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात,’’ अशी चिंता पंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्यक्त केली.शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २२वी वार्षिक परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट झाली होती. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली. यावेळी द्विपक्षीय चर्चेत मोदींनी युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. ‘ही युद्धाची वेळ नव्हे’, असा सल्लाही त्यांनी दिला होता.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने