शंकर शेठ रोड वरून स्वारगेट कडे जाणाऱ्या मार्गावर ST बसेसच्या रांगा.

स्वारगेट : शंकर शेठ रोड वरून स्वारगेट कडे जाणाऱ्या मार्गावर एस टी बसेसच्या रांगामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याने सोसायटीतील लोकांना वाट काढणेही मुश्किल झाले आहे. पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत डिझेल भरण्यासाठी ही वाहने पार्किंग करिता लागण्यास सुरुवात होतात. परिणामी अरुंद रस्त्यांमुळे छोट्या मोठ्या अपघाताला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार निर्मल टेरेस येथील सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.शंकर शेठ रोड वरील एस टी महामंडळाचे कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या डेपोत एस टी वाहने पार्किंग केली जातात. कार्यालयाच्या पुढच्या चौकात पौर्णिमा टॉवर शेजारी सरस्वती पेट्रोल पंप आहे. या पंपावर डिझेल भरण्यासाठी भर रस्त्यावर ही वाहने पार्किंग करत असतात.

सकाळी ६:३० ते ७ वा. च्या दरम्यान शाळेला मुलांना शाळेला जाण्याची वेळ असते. यावेळी सोसायटी गेटच्या समोरच एसट्या पार्किंग होत असल्याने शाळेची व्हॅन देखील आत येत नाही. या चौकात रहदारी मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा शाळेची वाहने निघून जातात. या कारणास्तव मुलांची शाळेला विनाकारण सुट्टी होते. अथवा मुलांना विलंब झाल्यास शाळेत प्रवेश नाकारला जातो. अनेकदा संबधित अधिकाऱ्यांना तक्रार करून ही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सोसायटीतील रहिवाशी राजेश संघवी, विद्या जैन, वनिता जैन, सोनल संघवी, शर्मिला ललवाणी, हर्षाली संघवी आदींनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने