बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा कारभार…”

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे सरकारकडून खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.“शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून कशाही पद्धतीने वागायला लागले आहे. कशापद्धतीने निर्णय घेणं सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाच्या परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला होता. आता शिंदे सरकारने बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्हाला त्यावर काहीही बोलयाचे नाही. महाराष्ट्रातील जन सुज्ञ आहे. आता जनतेनेच यांचा कारभार कशापद्धतीने चालला आहे आणि किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जात आहे, याचा विचार आता जनतेनेच करावा”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्मचाऱ्यांचे पगार, एसटीसाठीच्या उपाय योजना, सातवा आयोग, महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने