शिरसाटांना भेटण्यासाठी CM शिंदे थेट हॉस्पिटलमध्ये.

मुंबई:  शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना मंगळवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी एअर अँब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले. मुंबईत लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचारपुस करण्यासाठी रुग्णलयात दाखल झाले आहेत.आमदार शिरसाट यांच्यावर अँजोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. शिरसाट यांची प्रकृती उत्तम असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज रुग्णलयात दाखल होत शिरसाट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोन करुन शिरसाटांच्या परिवाराला धीर दिला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने