म्हणूनच मी माझी कॉलर उडवतो... उदयनराजेंनी सांगितलं कारण

सातारा: राजकारणी लोक कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे फेमस असतात. किंवा त्यांच्या एखाद्या वेगळ्या सवयीमुळे ते कायमच चर्चेत राहतात. अशीच एक सवय असणारा नेता म्हणजे खासदार उदयनराजे भोसले. ते प्रत्येक वेळी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना एका खास शैलीत कॉलर उडवण्याची त्यांची स्टाइल आहे. अशा पद्धतीने कॉलर का उडवतात, या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं आहे.

साताऱ्यात छत्रपती कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून उदयनराजे भोसले आक्रमक झाल्याचेही पाहायला मिळाले. उदयनराजे बोलताना म्हणाले की, लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील आणि प्रशासनाला ओळखत नाही अशी परिस्थिति होवू देवू नका असंही उदयनराजे म्हणालेत.हे सांगताना उदयनराजे स्टेज वरून उतरून खाली जमिनीवर मांडी घालून बसून बसले. वाडगं घेऊन कसं बसायचं हेही यावेळी त्यांनी दाखवलं आहे. लोकांचे कल्याण झाले पाहिजे अशीच माझी अपेक्षा आहे असं देखील उदयनराजे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने