‘मुकद्दर का सिंकदर’ चित्रपटातल्या ‘त्या’ किस्स्यावर अभिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबईः काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर लगेच त्यांच्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह बोमन ईराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता अशा कलाकारांनी काम केले होते. राजश्री फिल्म या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वर्षाच्या शेवटी अमिताभ आणखी एका चित्रपटासह प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत.या कार्यक्रमामधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांच्यासमोर सूरज दास असे नाव असलेले स्पर्धक बसले आहेत. केबीसीचा खेळ सुरु असताना सूरज म्हणाले, “तुमच्या ‘मुकद्दर का सिंकदर’ या चित्रपटाच्या सेटवर एका सीनमध्ये तुम्हाला विनोद खन्नांच्या तोंडावर ग्लासमधलं पाणी फेकायचं होतं. पण चुकून तुमच्या हातून तो ग्लास निसटला आणि विनोदजींच्या हनुवटीवर लागून त्याजागी १६ टाके पडले होते. हा किस्सा मी कुठेतरी वाचला होता. हे असं खरच घडलं होतं का?

त्याचे उत्तर देण्यासाठी बिग बी बोलायला सुरुवात करत “हो अगदीच खरं आहे. माझ्याकडून चूक झाली’ असे म्हणतात. पण उत्साहाच्या भरात सुरज त्यांना मध्येच टोकतात. त्यावर ते हसत ‘मला विचारलं आहे, तर मला बोलू द्या ना..’ असे म्हणतात. त्यानंतर थोडा वेळ शांत राहून सूरज पुन्हा त्यांनी वाचलेले किस्से-कहाण्या सांगू लागतात. त्यांनी केबीसीच्या खेळामध्ये २५ लाख रुपयांची कमाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने