खोटा वर्ग, आता शाळाच गायब झाली! फोटोशूटसाठी मोदींनी बनवला सेट?

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एका शिक्षणविषयक उपक्रमाचं उद्घाटन केलं. यानिमित्ताने त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांसोबत मोदी वर्गात बसलेले फोटोही व्हायरल होत होते. मात्र, मोदींनी भेट दिलेली शाळाच गायब झाल्याचं समोर आलं आहे.काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये केवळ एक सांगाडा दिसत आहे. याच ठिकाणी ती शाळा होती, जिथे पंतप्रधान मोदी बसले होते, असा दावा त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये अतुल लोंढे म्हणतात, "काल ज्या शाळेमध्ये बसून मोदी अभ्यास करत होते, आज ती शाळाच गायब झाली. मस्त शाळा बनवली होती!" यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. ही शाळा केवळ एक फिल्म सेटप्रमाणे असल्याची टीका अनेकांनी केली आहे.

कालच पंतप्रधान मोदी यांचे वर्गात बसलेले फोटो व्हायरल होत होते. ज्यामध्ये हा वर्ग आणि विद्यार्थीही खोटे असल्याचा दावा करण्यात आला होता. वर्गातली एक खिडकी खरी नसून ते केवळ चित्र आहे, असंही म्हटलं जात होतं. शिवाय विद्यार्थ्यांचे चेहरे पाहता त्यांच्या भावना खऱ्या वाटत नाहीत, वर्गाची फरशी एखाद्या स्टुडिओप्रमाणे कार्पेट घातलेली आहे, असे काही मुद्दे नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने