राज्य सरकारचा मोठा निर्णय! शिंदे गटातील ५१ आमदार- खासदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा, अमृता फडणवीसांच्या सुरक्षेतही वाढ

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यभार असणाऱ्या गृह विभागाने शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटातील ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांना वगळण्यात आलं आहे.एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस आणि एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाय प्लस सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यापुढे एक्स दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. याआधी त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली जात होती.

शिंदेंना पाठिंबा देणाऱे रामटेक लोकसभा मतदारसंघातील खासदार कृपाल तुमाने यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांना झेड दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.जस्टीस के यु चांदिवाल यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित प्रकरणी त्यांनी चौकशी केली होती. दरम्यान भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ताफ्यासहित वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असून, बॉलिवूड अभिनेता सलमान खानला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने