दसऱ्यात कुणी मारली बाजी? काय आहे तुमचं उत्तर

  मुंबई :राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी आज अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांची वादळी सभा पार पडली. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या ठाकरी शैलीत तोफ डागली. दुसरीकडे शिंदे यांनी देखील दीर्घकाळ भाषण करत उद्धव यांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे. आता सोशल मीडियावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी तुलना होताना दिसत आहे. यात कुणाची सरशी झाली, कोणी कुणावर केली कुरघोड़ी असे प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे.

आता आपण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका आणि त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पाहणार आहोत. उद्धव ठाकरे म्हणाले...

माझ्यासमोर सगळे एकनिष्ठ आहेत. काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यत दहा तोंडाचा होता आता 50 खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. या गोष्टीचा संताप आहे. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझी बोटं हालत नव्हती. त्यावेळी यांच्यावर मी जबाबदारी दिली होती ते आता कट्टापा...हे ते कट करत होते. ते पुन्हा आपल्यासमोर येऊच शकणार नाही. त्यांना कल्पना नाही की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही पंगा घेतला आहे देव तुमचे भले कर.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी एकेरीत ठाकरेंचा उल्लेख करुन आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे. शिंदे म्हणाले...

हा एकनाथ संभाजी शिंदे आहे... तुम्ही म्हणताय बापाचं नाव लावता... माझ्या बापाने मोठा त्याग केलाय.. माझ्या बायकोने सुद्धा त्याग केलाय तिने भोगलंय सोसलंय आणि तुम्ही त्याची टिंगल करताय? तुम्ही म्हणता माझ्या वडिलांचं नाव घेतो म्हणतात पण आम्ही त्यांचा विचार पुढे नेतोय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने