प्लाझा चित्रपटगृहाबाहेरच झोपायचे सिद्धार्थ जाधवचे वडील, अभिनेत्याला रडू कोसळलं, म्हणाला, “टॉवरमध्ये घर…”

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव आज मराठीमधील टॉपचा अभिनेता आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने काम करण्यास सुरुवात केली. पण यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा. कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. याबाबतच सिद्धार्थने आता झी मराठी वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमामध्ये खुलासा केला आहे. यावेळी त्याला अश्रूही अनावर झाले.‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाचं सिद्धार्थ सुत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाध्ये सिद्धार्थला खास सरप्राईज देण्यात आलं. हे खास सरप्राईज पाहून मंचावरच सिद्धार्थ ढसाढसा रडू लागला. कार्यक्रमामध्ये त्याच्या कुटुंबातील मंडळींनी हजेरी लावली होती. त्यांना पाहून सिद्धार्थ भावुक झाला.सिद्धार्थचे आई-वडील व त्याच्या भावाने कार्यक्रमाध्ये हजेरी लावत त्याला सरप्राईज दिलं. आपल्या जवळच्या व्यक्तींना मंचावर पाहून सिद्धार्थलाही सुखद धक्का बसला. आपल्या आई-वडील व भावाला मिठी मारून तो रडू लागला. त्यानंतर आपल्या खासगी आयुष्याबाबत तसेच घरातीच आर्थिक परिस्थितीबाबत त्याने भाष्य केलं.

तो म्हणाला, “दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाबाहेर माझे बाबा खाली पेपर टाकून त्यावर झोपायचे. त्यांना अभिमान आहे की आपल्या पोराने आज त्याच्यासमोरच असलेल्या टॉवरमध्ये घर घेतलं आहे.” आपल्या खासगी आयुष्याबाबत सांगत असताना सिद्धार्थसह मंचावर असणारी इतरही मंडळी रडू लागली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने