“आम्ही हे सगळं कधीच..” कियाराशी लग्न करण्याच्या चर्चांवर सिद्धार्थ मल्होत्राने सोडलं मौन.

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चत राहणारी जोडी आहे. हे दोघंही मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट केलं जातं. अशातच आता काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. लवकरच हे दोघं कोर्ट मॅरेज करणार असल्याचं बोललं जात असून दिल्ली येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाचं सेलिब्रेशन होणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. पण आता या सर्व चर्चांवर सिद्धार्थ मल्होत्राने मौन सोडलं आहे.सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ज्यात त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण ७’मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल खुलासे केले होते. अशात आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या तेव्हा चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण आता सिद्धार्थने त्याच्या लग्नाबाबत दिलेल्या प्रतिक्रियेनंतर मात्र चाहतेही संभ्रमात आहेत.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राला जेव्हा त्याच्या लग्नाच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने यावर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. सिद्धार्थला बॉलिवूडमध्ये १० वर्षं झाली आहेत आणि आता अशी कोणतीही गोष्ट त्याला त्रासदायक वाटत नाही असं तो या मुलाखतीत म्हणाला. सिद्धार्थने सांगितलं, “जर मी लग्न केलं तर त्यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. लग्न माझं होणार आहे आणि सत्य हेच आहे की हे सगळं आम्ही कधीच गुपित ठेवू शकत नाही.”दरम्यान यापूर्वी सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची बरीच वृत्त समोर आली होती. पण आता सिद्धार्थच्या या प्रतिक्रियेनंतर या सर्व अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ- कियारा नेमकं कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र यावर कियारा आणि सिद्धार्थने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने