ग्रहणानंतर हसरा सूर्य व्हायरल; नासाने टिपले अप्रतिम छायाचित्र

 अमेरिक:एस स्पेस एजन्सी नासा अनेक उपग्रहांच्या मदतीने अंतराळातील घटनांवर लक्ष ठेवण्याचे काम करते. हे करत असताना तेथील अनेक छायाचित्रही नासाकडून वेळोवेळी प्रकाशित केली जातात. असाच एक फोटो नासाकडून जारी करण्यात आला आहे. यामध्ये चक्क आग ओकणार सूर्य हसताना दिसून येत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नाराज व्यक्तीच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आल्याशिवाय राहणार नाही.सूर्याला सामान्यतः अग्नीचा मोठा ज्वलंत गोळा मानला जातो. अवकाशाच्या दुनियेत सूर्य हा एक असा तारा आहे, ज्याशिवाय मानवाला जीवनाची कल्पनाही करता येत नाही. वास्तविक नासाकडून हा फोटो अशा प्रकारे क्लिक करण्यात आला आहे ज्यामध्ये सूर्या हसताना दिसत आहे.हा फोटो पाहता सूर्या खूप चांगल्या मूडमध्ये असून मनमोकळेपणाने हसत असल्याचे दिसून येते. नासाने हा फोटो 27 ऑक्टोबरला सकाळी घेतले असून, नासाकडून हसऱ्या सूर्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.सूर्याचा हा फोटो शेअर करताना नासाने लिहिले की, आज नासाच्या डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीने सूर्याला 'हसत' कॅमेऱ्यात कैद केले. अल्ट्रा वायलट रेज किरणांच्या प्रकाशात दिसणारे सूर्यावरील हे काळे ठिपके कोरोनल होल म्हणून ओळखले जातात. हे असे क्षेत्र आहेत जिथे अवकाशात जोरदार सौर वारे वाहतात.

काय आहे फोटोची खासियत

हसऱ्या सूर्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण नुकताच नासाने शेअर केलेल्या फोटोची खासियत वेगळी आहे. याफोटोमध्ये सूर्य हा केवळ आगीचा गोळा नसून त्याचा पूर्ण चेहरा मानवासारखा दिसत आहे. नासाच्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेने घेतलेल्या सूर्याच्या फोटोमध्ये सूर्याला दोन डोळे, एक नाक आणि हसरे तोंड असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने