राहुल गांधी यांनी काँग्रेस जोडो यात्रा काढावी – शायना एन.सी

कोल्हापूर :देशातील काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा काँग्रेस जोडोचे काम करावे, असा टोला भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी येथे शनिवारी लगावला.पत्रकार परिषद बोलताना त्या म्हणाल्या, भारत जोडो यात्रा ही परिवार जोडो यात्रा आहे. मतदार हे जाणून असल्यामुळे दिवसेंदिवस भाजपच्या जनाधार वाढत आहे.राज्यातील औद्योगिक प्रकल्प गुजरात कडे वळत असल्याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये न्यायचे की अन्य कोठे हे सर्व उद्योगपतींनी ठरवायचे असते. याला सत्ताधारी लोक जबाबदार नाहीत असा निर्वाळा त्यांनी राज्यातील राज्य सरकारच्या बाजूने दिला.जायन्ट्स समूहाच्या विश्वाध्यक्षा शायना एन.सी यांनी येथील जायन्ट्स ग्रुपना भेट दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या , जायन्ट्स समूहाच्यावतीने आम्ही समाजातील उपेक्षितांसाठी काम करत आलेलो आहे. जायन्ट्सचे प्रमुख गिरीश चितळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने