भारतीय हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंग एफआयएच प्लेयर ऑफ द इयर

नवी दिल्ली :भारतीय पुरुष हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगची शुक्रवारी येथे सलग दुसऱ्यांदा पुरुष गटात एफआयएच प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. नेदरलँड्सचा ट्युएन डी नूझियर, ऑस्ट्रेलियाचा जेमी ड्वायर आणि बेल्जियमचा आर्थर व्हॅन डोरेन यांच्या एलिट यादीत सामील होऊन सलग दोन वर्षे पुरूष गटात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा हरमनप्रीत चौथा खेळाडू आहे.आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “हरमनप्रीत आधुनिक काळातील हॉकी सुपरस्टार आहे. प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचण्याची उत्कृष्ट क्षमता असलेला तो एक तल्लख बचावपटू आहे. हरमनप्रीतला २९.४ गुण मिळाले, त्यानंतर थियरी ब्रिंकमनने २३.६ आणि टॉम बूनने २३.४ गुण मिळवले. भारतीय उपकर्णधार हरमनप्रीतने एफआयएच हॉकी प्रो लीग २०२१-२२ मध्ये दोन हॅटट्रिकसह १६ सामन्यांमध्ये १८ गोल केले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने