महाराष्ट्राच्या खेळाडूंचा झंझावात कायम

 राजकोट :महाराष्ट्राच्या खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकांची लयलूट बुधवारीही कायम राहिली. तिरंदाजी, डायव्हिंग, टेनिस, स्क्वॉश, जलतरण या खेळांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांना गवसणी घालत आपली घोडदौड कायम ठेवली.आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे, प्रथमेश जवकर, प्रथमेश फुगे आणि पार्थ कोरडे यांनी अचूक निशाणा साधत विजयादशमीला महाराष्ट्र संघासाठी ब्राँझपदकावर मोहोर उमटवली. महाराष्ट्र संघाने पदकाच्या लढतीत उत्तराखंडला नमवले. महाराष्ट्र संघाने १३२- १२० ने विजय संपादन केला.जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या आरती पाटील हिने ५० मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले, तर स्वेजल मानकर याने ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत ब्राँझपदकावर नाव कोरले. मुलांच्या चार बाय दोनशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत महाराष्ट्राला ब्राँझपदक मिळाले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने