लोकांच्या समाधानासाठी स्वत:च्या सुखावर पाणी सोडणाऱ्या लिफ्ट ऑपरेटर पोराची कहाणी

उत्तरप्रदेश : एखाद्याच्या आयुष्यात कीती संघर्ष यावा यालाही मर्यादा असाव्यात. संघर्ष करून अनेकजणांनी यशाचे शिखर गाठल्याच्या चर्चा झाल्या असतील किंवा एखाद्याचा प्रवास आपण जवळून बघितला असेल. पण दुसऱ्यांच्या सुखासाठी आपल्या सुखावर पाणी सोडण्याची हिंमत करणारे खूप कमी लोकं असतात. असाच संघर्ष आहे विवेकचा. उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील पवनपुरी भागातील विवेकचा संघर्ष असाच काहीसा आहे.घरची परिस्थिती जेमतेम. वडील एका ठिकाणा लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करायचे. पण विवेकला गिटारची खूप आवड. गिटार शिकून मोठा म्युझिशियन व्हायचं सगळ्यांच जसं असतं तसंच त्याचंही स्वप्न होतं. पण अशा साध्या सरळ संघर्ष करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याला नियती गालबोट लावणार नाही ती कसली.हे सगळं सुरू असताना त्यांच्या वडिलांना आजारपणाने घेरलं. वडिलांच्या डोक्याची अचानक सर्जरी करावी लागली. येवढं झाल्यानंतर त्यांना काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी विवेकवर आली अन् विवेकला वडिलांच्या जागेवर नोकरी करणं भाग होतं. अशाच गिटार शिकण्यासाठी क्लास लावणे त्याला शक्य नव्हतं.

साल २०१७. विवेकला वडिलांच्या जागेवर लिफ्ट ऑपरेटरचं काम सुरू करावं लागलं. पण युट्यूबवरून गिटार शिकण्याचं काम अविरत चालूच होतं. पण अखेर जिद्द सोडली नाही. रॉकस्टार बननण्याचं स्वप्न उराशी बाळगणारा विवेक स्टेजवर नाही पण आता तो लोकांच्या दोन क्षणांच्या सुखासाठी आपलं काम संपल्यावर गिटार वाजवतो.तो आता कधी डॉक्टरांसाठी, कधी कट्ट्यावर तर कधी रूग्णांसाठी गिटार वाजवतो. त्याच्या गिटार वादनाने त्यांच्या कामाच्या तणावातून काही क्षण चेहऱ्यावर समाधान उमटतं हेच विवेकच्या आयुष्यातील समाधान आहे. हे समाधान त्याला पैसे खर्च करूनही मिळणार नाही असं तो सांगतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने