सलमान इज बॅक! सुंबुल आणि अंकितची काढली खरडपट्टी...

मुंबई:  बिग बॉसमध्ये खरी रंगत ही सलमान खानमूळेच असे त्याच्या चाहत्यांना वाटते आणि ते खरे देखील आहे. शोचे चाहते 'वीकेंड का वार' पेक्षा सलमान खानची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. सलमान खान डेंग्यूने त्रस्त असल्याने गेल्या आठवड्यातील 'वीकेंड का वार' होस्ट करू शकला नाही त्याच्या जागी करण जोहरने शोची धुरा सांभाळली.मात्र करण प्रेक्षकांचं पाहिजो तस मनोरंजन करु शकला नाही. याच कारणामुळे 'बिग बॉस'चे चाहते सलमान खानला मिस करत होते. सलमान खान आता बरा झाला असून तो इतकेच  'वीकेंड का वार' या एपिसोडच्या शूटिंगलाही परतला आहे. या शोचा प्रोमो नुकतीच पोस्ट झाला आहे. ज्यात सलमान त्याच्या जून्या अवतारात दिसतोय. येताच त्याने सुंबुल तौकीर खान, अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी यांचा जोरदार क्लास घेतल्याचे दिसतेय.सलमान 'वीकेंड का वार'मध्ये सुंबुलला पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न करतांना दिसतोय. प्रोमोमध्ये सलमान खान तिला म्हणताना दिसतोय की, 'सुंबूल, आजच्या तारखेत तू एक उदाहरण बनत आहेस. जी कुणाच्याही मागे लागते,रागवते,चिडते आणि नंतर रडत बसते. तु अशीच आहे का की तुलाच पहिल्यांदा कळतंय की तु अशी आहे. यानंतर सलमान सुंबुलला लिव्हिंग एरियापासून बेडरूम पॅसेजपर्यंत चालायला लावतो. मग तो तिला सांगतो, 'अशाच प्रकारे तु प्रत्येक एपिसोडमध्ये मागेच दिसते.' अशाप्रकारे सलमान सुंबुला चांगलच फटकारतो.

त्यानंतर सलमान अंकित आणि प्रियंकाकडे वळतो. सलमान प्रियांकाला म्हणतो, 'प्रियांका, तूच बिग बॉसला सांगितलं की अंकित आतून खूप मजबूत आहे. पण, आम्हाला कसे कळेल? एक्स-रे घ्यायचे? अंकित, तू कम्फर्ट झोनमध्ये चालला आहेस. तु इथ का आला आहेत?त्यावर अंकित म्हणतो की हा शो जिंकायला त्यावर सलमान म्हणतो मला तर असं वाटत नाही असं  तुला बघून आम्हांला वाटतं तुला इथे राहावंसं वाटत नाही का? असं वाटतंय की तुला जबरदस्तीने इथ ठेवलं आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने