टीम इंडियामध्ये खेळाडू कमी सपोर्ट स्टाफ जास्त, काय घडलं नेमकं?

 मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारी सूट-बूटमध्ये दिसत आहेत. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, 'पिक्चर परफेक्ट. T20 विश्वचषक आम्ही येत आहोत. 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. मात्र टीम इंडिया आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. नुकतेच आशिया कप-2022 मध्येही दोन्ही संघ आमनेसामने आले होते

बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का?. वर्ल्डकपला निघालेल्या टीम इंडियामध्ये खेळाडू कमी आणि सपोर्ट स्टाफ जास्त दिसत आहेत. या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मासह केवळ 14 खेळाडू दिसत आहेत. तर प्रशिक्षक राहुल द्रविडसह 16 जण स्टाफमध्ये दिसत आहेत. बीसीसीआयने टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. तसेच चार खेळाडूंना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. मात्र यादरम्यान अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.



बुमराहच्या बदलीची घोषणा अद्याप केली नाही. श्रेयस अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी हे स्टँडबाय खेळाडू आहेत. यापैकी श्रेयस, रवी आणि दीपक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहेत. या वनडे मालिकेनंतरच तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. मोहम्मद शमीची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी पुनर्वसनासाठी तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे आहे. शमीही नंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने