तेजस्विनी आणि अक्षयमध्ये फुलतोय का प्रेमाचा गुलमोहर?

मुंबईः बिग बॉस मराठी 4' हा शो सुरु झाल्यापासून यात अनेक चढ उतार पहायला मिळतात. कधी कुणाचं जोरदार भांडण तर कधी कुणाची जवळीक हा चर्चेचा विषय असतो. बिग बॉसच्या घरात क्षणात अनेक जोड्या तयार होतात आणि क्षणात तुटतात. मात्र क्वचितच जोड्या शोच्या शेवटापर्यंन्त टिकतात. अशाच एका जोडीची वाढती जवळीक पाहुन यादोघांमध्ये काय तरी शिजतय का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. हि जोडी आहे तेजस्विनी लोणारी आणि अक्षय केळकर यांची.घरातील सदस्य तेजस्विनी लोणारी आणि अक्षय केळकर यांच्यात प्रेमाचं नात फुलतांना दिसतय.या सदर्भातील हिंट ही बिग बॉसनेच दिली आहे. बिग बॉसने त्यांच्या इंस्टारग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. बिग बॉसच्या घरात नुकताच कॅप्टन पदासाठी टास्क खेळण्यात आला. त्यात तेजस्विनी आणि अक्षय हे विरोधी टीमकडून खेळताना दिसले.खेळत असतांना दोघांमधील जवळीक वाढली आणि गंमतीमध्ये आपलं एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली अक्षय आणि तेजस्विनीने दिली. ते दोघेही एकमेकांसोबत अत्यंत प्रेमाने बोलताय आणि अक्षयने तेजस्विनीला उचलूनही घेतलंय. अक्षय म्हणतो की त्याला त्याची पार्टनर मिळाल्याचं बोलतो. त्यावर तेजस्विनी म्हणतेय बघ हं खरंच प्रेमात पडशील.आता अक्षय आणि तेजस्विनी यांच्यातील संवाद आणि त्यांचे रोमँटिक फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होतायत. आता बिग बॉसमध्ये नवीन जोडी पाहायला मिळणार का याची उत्सूकता  प्रेक्षकांना लागली आहे. मात्र या दोघांनीही प्रेमासोबतच आपल्या खेळाकडे लक्ष द्यावे असा सल्ला त्याचे चाहते त्यांना देत आहे. आजच्या भागात चावडीवर काय होतं. बिग बॉस कोणाला धारेवर धरतात आणि कुणाच कौतुक करतात याकडे प्रेक्षकांच लक्ष लागलं आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने