Big Boss 16: घरात झाली पहिली चोरी,जेवण कमी पडेल म्हणून अब्दूनं चोरलं अंड; वाचा मजेदार किस्सा

बिग बॉस चा खेळ यंदा पूर्णुपणे बदललेला दिसतोय. यावेळी स्पर्धकच नाहीत तर स्वतः बिग बॉस देखील खेळाच्या मैदानात उतरले आहेत. कॅप्टनशीप पासून घरातल्या किराणा सामानापर्यंत सगळेच नियम आता बिग बॉसने बदलले आहेत. घरातल्या सदस्यांना मात्र या नव्या नियमांमुळे मोठी अडचण होतेय. तर तिथं लहानगा (उंचीनं लहान) अब्दू रोझिक घरात धम्माल करताना दिसत आहे.(Big Boss 16 Contestant Abdu rozik take eggs for himself,other housemates fight over ration)गेल्या भागात बिग बॉसनं घरातल्यांना रोजचं उपयोगी असलेलं किराणा सामान पाठवलं. पण ते पाठवताना बिग बॉसनं घोषणा केलं की यावेळी प्रत्येक स्पर्धकासाठी वेगवेगळं सामान पाठवलं जाईल. पण तरीदेखील घरात खाण्याचं सामान आल्यावर सगळे त्याच्यावर तुटून पडले. प्रत्येकजणं त्यातून आपल्या आवडीची गोष्ट घेण्यासाठी वाद घालताना दिसला.खाण्या-पिण्याच्या सामानासाठी घरातले जिथे एकमेकांवर भडकताना दिसले, तिथे लहानगा अब्दू रोझिक मात्र आपल्या नटखट अंदाजात चाहत्यांचे मन जिंकताना दिसला. अब्दू घरात किराणाचं सामान आल्यावर आपल्यासाठी अंडी घेतो. जर घरातल्या सगळ्यांना आपल्या खाण्याची चिंता सतावतेय तर अब्दू कसा मागे राहिल बरं. यादरम्यान जेव्हा किराणा मालाचं विभाजन केलं जातं तेव्हा घरातील इतर सदस्य अब्दूला मजे-मजेत चोरी करायला शिकवतात.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने